UFBU, संप आणि आपण:
UFBU, संप आणि आपण:
सूचना: हा लेख मी माझ्या बँक कर्मचारी बांधवांसाठी लिहीत आहे. असे असले तरी बाकीच्यांनीही वाचायला हरकत नाही, परंतु वाचताना बँक कर्मचारी वर्गाबाबतचे पूर्वग्रह दूषित विचार (असल्यास) मनातून काढून टाकून व कर्मचारी बांधवाना समजून घेण्याच्या उद्देशाने वाचवा.
मित्रांनो, बँक कर्मचाऱ्यांची शिखर संघटना United Forum of Bank Unions म्हणजेच UFBU ने वेतन करार व आपल्या आणखी काही मागण्यांसाठी ३ टप्य्यांमध्ये संपाची घोषणा केली आहे. पहिला टप्पा २ दिवसांचा, दुसरा ३ व तिसरा अमर्यादित काळासाठी आहे. यातून पहिले तर हा संदेश आहे की, आपण (UFBU) चर्चा करायला तयार आहोत. जर चर्चा करण्यासाठी आपण तयार नसतो तर अमर्यादित काळासाठीच्या संपाची हाक पहिल्यांदाच दिली असती. तसेच आपला उद्देश कुठेही ग्राहकांना वेठीस धरणे, बँकांचा व्यवसाय बुडविणे हा नसून आपल्या मागण्या प्रभावीपणे मांडणे हा आहे. UFBU ने जो कार्यक्रम दिला आहे त्याची अंमलबजावणी आज म्हणजेच दिनांक २० जानेवारी २०२० पासूनच सुरू करायची आहे.
आता आपली जबाबदारी सुरू होतेय. आपला संप व बाकीचे कार्यक्रम जसे, निदर्शने, पत्रकार परिषद, नियमाप्रमाणे काम, इ. हे ग्राहकांच्या अडवणुकीसाठी नाहीय हे पहिले आपण जनतेला पटवून द्यायला हवेत. गेल्या ५-६ वर्षांचा विचार केला तर सर्वात जास्त सरकारी योजना ह्या बँकांमार्फतच राबविल्या गेल्या व आपण त्या यशस्वीही हे लोकांना कळू द्या. कधीकाळी वेतनाच्या बाबतीत उच्चतम असलेला बँक कर्मचारी वर्ग हा आज किती कमी पगार घेतो हे समजवून सांगा. २ मे २०१७ रोजी आपल्या वेतन करारासाठी समजोता बैठक सुरू झाल्या. मागचा वेतन करार हा ३१ ऑक्टोबर २०१७ लाच संपला. आज पर्यंत २१ फेऱ्या आणि जवळपास ३ वर्षानंतरही आपला वेतन करार पूर्ण होऊ शकलेला नाहीय. आपल्यातील अधिकारी वर्गाची परिस्थिती तर आणखी बिकट आहे. न त्यांच्या कामावर यायची वेळ ठरलेली आहे न घरी जायची. गेल्या काही वर्षात किती बँक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली याची आकडेमोड न केलेलीच बरी. मित्रांनो, आठवा तो २०१६ चा नोव्हेंबर महिना, नोटबंदीचा काळ, तहानभूक विसरून आपण केलेले काम. आणि त्याबदल्यात आपल्याला काय मिळाले? रांगेतील लोकांचा मृत्यू (ती खेदजनकच बाब आहे) होत होता हे मीडियाला बरोबर दिसले परंतु कामाच्या अतिताणामुळे मृत्यू पावलेल्या बँकर्स कडे मात्र सोयीस्कर कानाडोळा? हेच आज रस्त्यावर उतरून जनतेला सांगायची वेळ आली आहे.
मित्रांनो अजूनही बड्या उद्योगपतींच्या बुडीत कर्ज वसुलीसाठी पाऊल उचलले जात नाहीय परंतु वाढत्या NPA साठी सामान्य कर्मचारी वर्गाला दोषी ठरवले जाते, हे कसे काय? आपण अश्या काय अवास्तव मागण्या केल्या की ज्या IBA पूर्ण करू शकत नाही? कर्मचारी वर्गामुळे बँकांच्या नफ्यात घसघशीत वाढ होत आहे परंतु कर्मचारी मात्र फक्त आणि फक्त कामाच्या ओझ्याखाली दबला जात आहे. सरकारच्या प्रत्येकासाठी बँकिंग या धोरणामुळे आज शाखांमध्ये, खातेदारांमध्ये कित्येक पटींने वाढ होतेय परंतु कर्मचारी वर्ग मात्र अपुराच आहे. उलट सेवानिवृत्त झालेल्या बांधवांच्या जागी नवीन भरती होत नाहीय.
ही आपली आता आरपारची लढाई सुरू झालिय आणि आपण सर्व त्या लढाईतील शिपाई आहोत. UFBU ने दिलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार आपण सर्व यात सहभागी होऊन आपली ताकद दाखविण्याची हीच वेळ आहे.
आता थोडेसे UFBU विषयी:
मित्रांनो, नवीन भरती झालेल्या किंवा आपल्याही बऱ्याच बांधवाना UFBU बद्दल नक्की माहिती नसते. UFBU चे सदस्य नक्की कोण असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.
UFBU आपल्या ९ संघटनांचा एक Forum आहे. त्या ९ संघटना:
1. All India Bank Employee's Association (AIBEA)
2. All India Bank Officer's Confederation (AIBOC)
3. National Confederation of Bank Employees (NCBE)
4. All India Bank Officer's Association (AIBOA)
5. Bank Employee's Federation of India (BEFI)
6. Indian National Bank Employees Federation (INBEF)
7. Indian National Bank Officer's Congress (INBOC)
8. National Organization of Bank Workers (NOBO)
9. National Organization of Bank Officers (NOBO)
आपण सर्व यातील कोणत्या ना कोणत्या संघटनेशी जोडलेले आहोत कसे ते बघूया. उदा. मी State Bank of India Staff Union (Mumbai Circle) चा सदस्य आहे आणि ही युनियन संलग्न आहे All India State Bank of India Staff Federation (AISBISF) सोबत. आता AIBSBISF संलग्न आहे NCBE सोबत. या पद्धतीने भारतातील प्रत्येक बँक कर्मचारी आणि ७ व्या स्तरापर्यंत चे अधिकारी UFBU चे सदस्य आहेत आणि त्या प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे की UFBU च्या लढाईत सक्रिय सहभाग घेणे.
तर मग मित्रांनो आहात ना तय्यार?
सोबत UFBU ने दिलेली कार्यक्रम पत्रिका जोडली आहे.
आपला
हर्षद रविकांत पाबळकर
उपाध्यक्ष, स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन, मुंबई सर्कल
केंद्रीय समिती सदस्य, नॅशनल कॉन्फडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईस

हर्षद , अतिषय छान पद्धतीने विचार मांडले आहेत, हा लढा यशस्वी करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
ReplyDeleteखूपच आनंद झाला आहे मित्रा, तू लिहलेला पहिला ब्लॉग पण मी वाचला आहे, अत्यंत महत्वाची , उपयोगी व सामान्य जनतेला माहिती नसणारी, अशी माहिती तू मुद्देसूद पण मांडली आहेस, व पुढे होणारे संप व ते का? समज बँक कर्मचाऱ्यां बद्द्ल समज गैरसमज अगदी महत्वाचा विषय खूप योग्य पध्दतीने मांडला आहेस। नक्कीच याची दखल सरकार येणाऱ्या काळात घेईल अशी आशा ठेवतो। तुला खूप खूप शुभेच्छा, तुझ्या पुढच्या ब्लॉग च्या प्रतीक्षेत।
ReplyDelete🙏🙏
ह्या आधी पण अनेक वेळा संप पुकारला गेला व तो रद्द करण्यात आला. अश्याने बँकर्स लढण्यात कमजोर आहे हे दिसून येत व IBA याचा फायदा घेतो. ह्या वेळी माघार नाही अशी अपेक्षा करूया.. 👍
ReplyDeleteहर्षद थोडक्यात आणि मुद्देसुद माहीती दिलेली आहे
ReplyDeleteधन्यवाद
Ekdam sahi hai. Excellent & informative blog👍
ReplyDelete