बतावणी
रमेश: अरे ३१ आणि १ ला काय करतोय?
सुरेश: काही नाही रे, सुट्टी आहे ३ दिवस, जरा सहलीला जाऊन यावं म्हणतोय.
रमेश: हो का? मी तर ऐकले होते संप आहे, आणि तू म्हणतो की सुट्टी आहे, काही कळत नाही बघ.
सुरेश: अरे म्हणजे संपच आहे, आपल्याला तेव्हडीच सुट्टी.
रमेश: म्हणजे तुला नकोय का पगारवाढ?
सुरेश: तसे नाही रे
रमेश: Ok, Ok, म्हणजे तुला ५ दिवसांचा आठवडा नकोय तर.
सुरेश: असं कसं, हवाय तर.
रमेश: समजले, तू NPS मध्ये खुश आहेस.
सुरेश: नाही रे NPS मध्ये कोण कसं काय खुश राहू शकते?
रमेश: अरे राजा, मग आपल्या हक्कांसाठी कुणीतरी लढते आहे, आणि त्यांना साथ द्यायची सोडून तू म्हणतो की सुट्टी आहे, ३ दिवस सहलीला जातो म्हणून?
सुरेश: मग मी काय करू शकतो? आणि संघटनेचे पदाधिकारी करतात की निदर्शने? मग मी एक नसल्याने काय फरक पडतो?
रमेश: मी ही तेच म्हणतोय, सगळ्यांना पगारवाढ मिळाली आणि तुला एकट्याला नाही मिळाली तर असा काय फरक पडतो?
सुरेश: पगारवाढ हा माझा हक्क आहे आणि तो मला मिळायलाच हवा.
रमेश: तुला हक्क बरोबर समजतो, आणि कर्तव्य नाही समजत का? संघटनेचे पदाधिकारी घरदार सोडून संप यशस्वी व्हावा, जास्तीत जास्त लोकांना आपल्या भावना समजाव्या म्हणून मर मर मरताय आणि तू सहलीला जातोस? त्यांना नकोय का सुट्टी? असं प्रत्येक जण म्हणाला की माझ्या एकट्याने काय फरक पडणार आहे, तर मग कुणीच नाही उतरणार रस्त्यावर. आणि आता बँकर्स चा आवाज जर सरकारच्या कानावर घालायचा असेल, नुसता घालायचा नाही तर कानात घुमवायचा असेल तर रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. मी तर म्हणतो संघटनेने नोंद ठेवायला हवी की कोण येतय आणि कोण नाही, आणि जे येणार नाही त्यांच्या बद्दल व्यवस्थापनाला कळवायला हवे की यांना पगारवाढ नाही दिली तरी चालेल, तेव्हढा पगार जे आले त्यांना जास्त द्या.
सुरेश: दोस्ता, तू माझे डोळे उघडलेस, आता ३१ आणि १ ला मी तर जाणारच पण माझ्यासोबत कमीत कमी आणखी ५ जण घेऊन जाणार. आणि जरा तुझ्याकडे त्या घोषणा असतील तर पाठव की, १ दिवस आहे आपल्याकडे, पाठांतर करून घेतो सगळ्यांकडून.
रमेश: आत्ता कसं दोस्ता, बोल की मग मोठ्याने
कोण म्हणतो देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही
मित्रांनो,
कशी वाटली बतावणी? आलं ना लक्षात मला काय म्हणायचंय ते? तर मग होणार ना सामील? ठिकाण आणि वेळ विचारताय? तुमच्या जवळच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा. आणि द्या एक मोठ्याने आवाज
हम सब एक है

आपला
हर्षद रविकांत पाबळकर
उपाध्यक्ष, स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन, मुंबई सर्कल
केंद्रीय समिती सदस्य, नॅशनल कॉन्फडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईस
Comments
Post a Comment