फाटक्या नोटांचे नक्की काय करावे?

फाटक्या नोटांचे नक्की काय करावे?
सूचना: या ब्लॉग मध्ये केलेले लेखन हे फक्त दिशादर्शक आहे. RBI च्या अचूक निर्देशांसाठी वेळोवेळी www.rbi.org.in येथे भेट द्यावी.
मित्रांनो,
आपल्या सगळ्यांकडे फाटक्या नोटा ह्या व त्यांचे काय करायचे जेणेकरून आपले नुकसान होणार नाही हा प्रश्न आपल्या सर्वांनाच सतावत असतो. या लेखात आपण त्या नोटा कशा व कुठे बदली करायच्या, त्यांची किती किंमत आपल्याला मिळणार याबद्दल चर्चा करणार आहोत.
           RBI च्या नियमानुसार (Section 28 read with Section 58(2)of Reserve Bank of India Act, 1934) कुणीही व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या नोटांसाठी परताव्याचा हक्क सांगू शकत नाही, परंतु नागरिकांचे विनाकारण नुकसान होऊ नये यासाठी RBI च्या कडून सर्व बँकांना फाटलेल्या नोटा स्वीकारण्याचे व त्यांचा योग्य परतावा देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यानुसार फाटलेल्या, खराब झालेल्या नोटा बदलणे ही सर्व बँकांची जबाबदारी आहे.
            असे असलेतरी नोटांचे मूल्यांकन करण्यासाठी कमीत कमी वर्ग १ दर्जाचा बँक अधिकारी हवा असतो व शक्यतो त्या दर्जाचा अधिकारी हा तालुकास्तरीय किंवा मोठ्या शाखांमध्ये कार्यरत असतो. त्यामुळे आपल्या नोटा ह्या शाखांमध्येच बदलण्याचा प्रयत्न करावा. तसेच, नोटा बदलताना काही प्रमाणात आपल्याला शुल्क द्यावे लागण्याची शक्यता असते (त्याबद्दल शेवटी लिहिले आहे) व ते शुल्क आकारणे बँकेला सोपे जावे म्हणून आपले खाते असलेल्या बँकेतच नोटा बदलणे सोयीस्कर असते.

नोटांचे मूल्यांकन:
या लेखात आपण फक्त फाटलेल्या नोटांचेच मूल्यांकन कसे करतात ते बघुयात. (खराब झालेल्या, चुकीच्या छापलेल्या, जुन्या व वापरण्यास अयोग्य नोटांसाठी www.rbi.org.in येथे भेट द्यावी)

रु. ५०/- आणि त्यावरील मूल्यांच्या नोटांकरिता काही नियम:
i) जर नोटेचा सर्वात मोठा तुकडा हा ८०% पेक्षा जास्त क्षेत्रफळाचा असेल तर आपल्याला त्या नोटेची पूर्ण रक्कम परत मिळू शकते.
ii) जर नोटेच्या सर्वात मोठ्या तुकड्याचे क्षेत्रफळ हे ४०% पेक्षा जास्त परंतु ८०% पेक्षा कमी असेल तर आपल्याला त्या नोटेची अर्धी रक्कम परत मिळू शकते.
iii) जर नोटेच्या सर्वात मोठ्या तुकड्याचे क्षेत्रफळ हे ४०% पेक्षा कमी असेल तर आपल्याला त्या नोटेची कोणतीही रक्कम परत मिळत नाही.
iv) जर आपल्याकडे एकाच नोटेचे ४०% पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले २ तुकडे असतील तर आपल्याला त्या नोटेची संपूर्ण रक्कम मिळू शकते.
रु. ५०/- व त्यावरील नोटांचे क्षेत्रफळ खालीलप्रमाणे असते.

महत्वाचे:
*एक व्यक्ती नोटांचे २० तुकडे किंवा रु. ५०००/- (जे कमी असेल ते) बँकेत प्रत्येक दिवशी विनाशूल्क बदलू शकतो.
*जर एक व्यक्ती २० तुकडे किंवा रु. ५०००/- पेक्षा जास्त नोटा एका दिवसात बदलू इच्छित असेल तर बँक त्यावेळी फक्त पावती देईल व नंतर त्या नोटांचे मूल्यांकन करून ती रक्कम त्या व्यक्तीच्या खात्यात जमा करेल. या साठी बँक ठराविक शुल्क आकारू शकते.
तर मित्रानो आहे की नाही सोपी प्रक्रिया?
आपला
हर्षद रविकांत पाबळकर
उपाध्यक्ष, स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन, मुंबई सर्कल
केंद्रीय समिती सदस्य, नॅशनल कॉन्फडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईस

वरील लेखात काही चूक असल्यास किंवा आपल्या सूचना harsh.pabalkar@gmail.com वर पाठवाव्यात

Comments

  1. खूपच छान उपक्रम
    आता बोगस नोटांच करायचं काय हे घ्या
    Hallppy makarsankranti from chennai

    ReplyDelete
  2. Dear very useful and updated knowledge effort taken by you I think it is work and job of Bank management, but they doesn't aware of these issues, very helpful and nice, you are giving your valuable time for this.... Thank you all the best.. Dinesh Kaushik Nashik

    ReplyDelete
  3. Very nice and valuable information. Thanks Rahul

    ReplyDelete
  4. हर्षद खुप छान ऊपक्रम सुरु केलास. खुप खुप शुभेच्छा

    ReplyDelete
  5. Harshad, you are working hard for our Bank as well as for members / non members of Union. You are Idol for Young Generation. Congratulations & wish you all success in future career.

    ReplyDelete
  6. Harshad
    Congratulations & wish you sucsess in future
    👍👌

    ReplyDelete
  7. Good job.Keep effort future for guidance.

    ReplyDelete
  8. Very usefull information Harshad keep it up I salute you for your dedication for members. & Bank

    ReplyDelete
  9. Khup sundar upakram aahe sir.. plss be continue.. thanku very much

    ReplyDelete
  10. Very useful information for every banker.

    ReplyDelete

Post a Comment