बँकर्स: दुर्लक्षित योद्धे
बँकर्स: दुर्लक्षित योद्धे "जर देशाची सेवा करायची असेल तर प्रत्येकाने सीमेवर जायची गरज नाही". मित्रांनो, वरील वाक्य आपण खूप वेळा ऐकतो, पण आपल्या देशात असेही काही योद्धे आहेत जे कायम दुर्लक्षित राहिले आहेत. प्रत्येक लढाईमध्ये त्यांनी आपले सर्वोत्तम योगदान दिले आहे. लढाई वेगळ्या प्रकारची असेलही परंतु म्हणून त्यांचे योगदान नाकारता येणार नाही. होय, ते योद्धे म्हणजे बँक कर्मचारी. आजमितीला सर्व जग कोरोनाशी घरात बसून लढतेय, परंतु आमचे बँक कर्मचारी मात्र रोज बँकेत हजर राहून समाजाची सेवा करताय. संपूर्ण भारत बंद असताना सुद्धा येनकेन प्रकारे आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचत आहेत. आणि एव्हडे सगळे करूनही ते दुर्लक्षितच आहेत. सरकारने सर्व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कामगार, कर्मचारी वर्गाला रू. ५० लाखाचे विमा संरक्षण जाहीर केले मात्र बँक कर्मचारी वर्गाला त्यातून वगळले. आरोग्य कर्मचारी संपूर्ण PPE KIT घालून काम करताय (ते करत असलेले काम हे सर्वोत्तम आहेच, त्याबद्दल शंकाच नाही) परंतु बँक कर्मचारी मात्र अपुऱ्या सुविधेतच क...