बतावणी
रमेश: अरे ३१ आणि १ ला काय करतोय? सुरेश: काही नाही रे, सुट्टी आहे ३ दिवस, जरा सहलीला जाऊन यावं म्हणतोय. रमेश: हो का? मी तर ऐकले होते संप आहे, आणि तू म्हणतो की सुट्टी आहे, काही कळत नाही बघ. सुरेश: अरे म्हणजे संपच आहे, आपल्याला तेव्हडीच सुट्टी. रमेश: म्हणजे तुला नकोय का पगारवाढ? सुरेश: तसे नाही रे रमेश: Ok, Ok, म्हणजे तुला ५ दिवसांचा आठवडा नकोय तर. सुरेश: असं कसं, हवाय तर. रमेश: समजले, तू NPS मध्ये खुश आहेस. सुरेश: नाही रे NPS मध्ये कोण कसं काय खुश राहू शकते? रमेश: अरे राजा, मग आपल्या हक्कांसाठी कुणीतरी लढते आहे, आणि त्यांना साथ द्यायची सोडून तू म्हणतो की सुट्टी आहे, ३ दिवस सहलीला जातो म्हणून? सुरेश: मग मी काय करू शकतो? आणि संघटनेचे पदाधिकारी करतात की निदर्शने? मग मी एक नसल्याने काय फरक पडतो? रमेश: मी ही तेच म्हणतोय, सगळ्यांना पगारवाढ मिळाली आणि तुला एकट्याला नाही मिळाली तर असा काय फरक पडतो? सुरेश: पगारवाढ हा माझा हक्क आहे आणि तो मला मिळायलाच हवा. रमेश: तुला हक्क बरोबर समजतो, आणि कर्तव्य नाही समजत का? संघटनेचे पदाधिकारी घरदार सोडून संप यशस्वी व्हावा, जास्तीत जास्त लोकांना ...