बँकांच्या सुट्ट्या आणि पोटदुखी
नमस्कार मित्रांनो, आत्ताच बहुचर्चित "मार्च एंड" पार पडला. खरं तर हा लेख मला मागच्याच आठवड्यात लिहायचा होता, परंतु मी सुद्धा आर्थिक वर्ष अखेरीच्या गडबडीत अडकलो असल्यामुळे वेळ मिळाला नाही. आज खूप दिवसांनंतर निवांत असल्यामुळे खास वेळ काढून लिहायला बसलो. तर आता मुद्द्यावर येवुया, मागील काही आठवडे आपल्या देशातील "Whatsapp University" या अत्यंत प्रतिष्ठित विद्यापीठात एक बातमी फिरत होती. "आपले काम लवकर उरकून घ्या, मार्च आणि एप्रिल महिन्यात अमुक दिवस बँक बंद" अशा आशयाची ती बातमी होती. आणि ती बातमी वाचून "Whatsapp" चे सुशिक्षित (?) वाचक बँकेत आपले काम उरकून घेण्यासाठी गर्दी करत होते. (येथे नोंद घ्यावी की त्यांना Whatsapp वापरता येते पण बँकेची सुरक्षित इंटरनेट बँकिंग वापरता येत नाही.) ही बातमी खरी की खोटी याची शहानिशा न करता लोक बँकेत गर्दी करत होते. एकीकडे सरकार गर्दी टाळण्याचे आवाहन करत होते, तर दुसरीकडे Whatsapp, Facebook, Tiktok, PubG वापरणारे, खिशात २-२ Android, Apple बाळगणारे,...